ठाणे : स्वतःला टीसी असल्याचं भासवून एका १५ वर्षांच्या मुलीला खेचत स्टेशनबाहेर नेण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडल्याचे समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोतया टीसीनं केलेलं हे कृत्य ठाण्याच्या रेल्वे ब्रीजवर घडलं. ठाण्यातील एका खासगी क्लासमध्ये १२ वीचे धडे घेण्यासाठी ही मुलगी रोज बदलापूरहून अपडाऊन करते. संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास क्लास संपवून घरी निघाली होती. तिने सॅटीस पुलावरून रेल्वे स्टेशनवर प्रवेश करताच तिला या तोतया टीसीने हटकलं. 


आपला फर्स्ट क्लासचा पास मुलीनं त्याला दाखवला. तरीही तुला साहेबांसमोर जावं लागेलं असं म्हणत तो तिला रेल्वे स्थानकाबाहेर जबरदस्ती घेवून जाऊ लागला. पण गर्दीचा फायदा घेत मुलीनं तिथून पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत आपल्या वडिलांना ही हकीगत फोन करून सांगितली.


पुढे हिम्मत दाखवत या बाबत ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. या घटनेनंतर आता एकच खळबळ उडलीय. शिवाय रेल्वे स्टेशन आणि परिरसातल्या महिला सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.