सांगली : मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सांगलीत कालपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अन्नदान, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या संघटनांनी आपले स्टॉल्सही उभे केले आहेत. संपूर्ण शहर आणि मोर्चाचा तीन किलोमीटरचा मार्ग भगव्या झेंड्यांनी भगवामय झाला आहे.


शहरात वाहतुकीची कोंडी होऊनये म्हणून प्रशासनानं सर्व वाहनांच्या पर्किंगचे काटेकोरपणे नियोजन केले आहे. मिरज गांधी चौकातून मोर्चात सहभागी होणा-या वाहनांशिवय इतर वाहनांना सोडण्यात येणार नाही. मोर्चाच्या दिशेनं येणा-या सर्व वाहनांना त्याच मार्गाव पार्किंगची सोय केली आहे.