गणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात
गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.
मुंबई : गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्राकात आरटीओ कार्यालये किंवा पोलीस ठाण्यात हे पास देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण कालपासून आरटीओ कार्यालयात यासंदर्भात काहीच तयारी नव्हती.
आज सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप आहे. त्यामुळे चाकरमानींमध्य़े संभ्रमाचं वातावरण होतं. आता हा संभ्रम दूर झाला असून जवळच्या वाहतूक चौकीवर किंवा पोलीस ठाण्यात सकाळी 10 ते 5 या काळात टोल माफीचे पास देण्यात येत आहेत.