पुणे : निवडणूक लढवताना उमेदवाराकडे आत्मविश्वास जरुर असावा मात्र तो जर अति झाला तर त्याची माती होते. असेच काहीसे पुण्याच्या प्रभाग क्र १६ कसबा-सोमवार पेठेतील भाजपचे उमेदवार गणेश मधुकर बीडकर यांच्यासोबत घडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकाचा निकाल जाहीर होण्याआधीच त्यांनी आपल्या विजयी मिरवणुकीचा मेसेज सर्वांना पाठवला. या निवडणुकीत आपणच विजयी होणार असा अतिआत्मविश्वास बिडकरांना होता.


त्यामुळे प्रभागाची मतमोजणी सुरु होण्या आधीच विजयी मिरवणूकीची घोषणा केली होती. मात्र निवडणूक निकालात अखेर चित्र स्पष्ट झाले आणि हा अति आत्मविश्वास फोल ठरला. 


धंगेकरांना भाजपमधे यायचे होते, बिडकरांनी येवू दिले नाही. धंगेकर बिडकरांच्या समोर उभे न राहता वेगळ्या गटातुन उभे रहायला तयार होते. परंतु राहीन तर धंगेकरांच्याच विरुध्द उभे राहीन आणि हरवेन तर धंगेकरांनाच हा बिडकरांचा हट्ट होता. बिडकरांना सुरुवातीपासुन शेवटपर्यंत हा अति आत्मविश्वास नडला आणि त्याच्या पारड्यात पराभव पडला. 


हा बीडकरांनी पाठवलेला होता मेसेज
प्रभाग क्र. १६ कसबा – सोमवार मधील उमेदवारांची विजयी रॅली
बिड़कर गणेश मधुकर.
वारभुवन छाया विजय.
सोनवने वैशाली विश्वासराव.
समेळ योगेश दत्तात्रय.
स्थळ: 100-सोमवार पेठ,बिड़कर असोसीयेट्स,खडीचे मैदान येथून संध्याकाळी 7वा.निघेल.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.
आपला
गणेश बिड़कर