गणेशोत्सवात नागपूर पोलीस आणि ATS ची संयुक्तपणे मोहीम
नागपूर पोलीस आणि ATS ने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
नागपूर : १० दिवसाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्याकरता कुख्यात दहशतवाद्यांचे फोटो सार्वजनिक गणेश मंडळात लावण्यात आलेत. नागपूर पोलीस आणि ATS ने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या NIA गुप्तचर संस्थेने जाहीर केलेल्या दहशतवाद्यांचे फोटो विविध गणेशोत्सव मंडळात लावण्यात आलेत.. नागपुरातील सर्वच सुमारे १,४०० सार्वजनिक मंडळात हे पोस्टर लावण्यात आलेत. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न असल्याचे नागपूर पोलिसांतर्फे सांगण्यात आले.