राजापूर : कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूरमधील गंगेचं आज पहाटे आगमन झालंय. आज पहाटे 6 वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या[पूर्वी दर तीन वर्षांनी या गंगेचं आगमन व्हायचं, मात्र 2012 साला पासून दरवर्षी गंगेचं आगमन होत आहे. राजापूरची ही गंगा शास्त्रज्ञांसाठी गूढ मानली जात आहे. राजापूरची ही गंगा अनेकांचं श्रद्धास्थान आहे. 


उन्हाळे गावात ही गंगा अवतरते.  मात्र यावर्षी श्रावण महिन्याच्या शेवटी आणि ऐन पावसाळ्यात गंगा अवतरली आहे. सध्या उन्हाळे गावातल्या 14 कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. गो मुखातून हे पाणी येण्यास सुरुवात झालीय.


इथल्या गंगा कुंडात 10 नद्यांचं पाणी येतं असं सांगितलं जात. उन्हाळे गाव मुंबई गोवा महामार्गावरच आहे त्यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी गंगेच्या ठिकाणी होणार एवढं मात्र नक्की.