रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना नायशी गावातल्या एका शेतात तब्बल तीन वर्षांनी चक्क गंगा अवतरलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गंगेच्या रुपात पाण्याचे पाच झरे खळखळायला लागलेत. निसर्गाच्या या चमत्कारानं पंचक्रोशीत बघ्यांची गर्दी झालीय. तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणी चार झरे निर्माण झाले होते. त्यामुळे जवळपास पंधरा दिवस हे शेत पाण्यानं भरलं होतं.



उन्हाळ्यात दाहीदिशा फिरण्याची वेळ या ग्रामस्थांवर येते. मात्र  निसर्गाच्या या किमयेमुळे सारेच जण थक्क झालेत. निसर्गाच्या या चमत्कारासमोर सर्वसामान्य ग्रामस्थ श्रद्धेनं नतमस्तक झाले असले तरी विज्ञाननिष्ठ या मागची शास्त्रीय कारणं समोर ठेवतात.


विज्ञानाच्या केशाकर्षण नियमानुसार भूगर्भातील पाणी वर उचललं जातंय आणि त्याचाच हा परिणाम असल्याचे ते सांगतात.