नवी मुंबई : आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं निराश झालेल्या विद्यार्थिनीनं  गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कळंबोलीत घडलीय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळंबोली सेक्टर-4 मध्ये राहणा-या पुष्पा सूर्यवंशी या विद्यार्थिनीनं आत्महत्या केलीय.. पुष्पाला दहावीत 83 टक्के गुण मिळाले होते.. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिनं ऑनलाईन अर्ज भरला होता.. त्यात तिचा इतर कॉलेजमध्ये नंबर देखील लागला होता. मात्र कळंबोलीतील सुधागड कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तिचा आग्रह होता.. 


कॉलेज जवळ असल्यानं तिनं आणि तिच्या मावस बहिणीनं प्रयत्न सुरु केले होते.. सुधागड शाळेने डोनेशन घेऊन ऑफलाईन प्रवेश देण्याची तयारी केली होती.. त्यानंतर पुष्पाच्या नातेवाईकांनी इतर कॉलेजमध्ये लागलेला तिचा नंबर रद्द करुन सुधागड शाळेमध्ये पैसे भरले होते... मात्र सुधागड कॉलेजकडून अनेक विद्यार्थी आणि पालकांना बोलावून ऑफलाईन प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.. 


त्यामुळं आपलंही ऍडमिशन रद्द होईल या भीतीने पुष्पानं राहत्या घरी आत्महत्या केलीय.. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये ऍडमिशन न मिळाल्याची खंत पुष्पानं व्यक्त केलीय.. 



प्रवेश ऑनलाइनच होतील - विनोद तावडे


अकरावीचे प्रवेश ऑनलाईनच होतील असंम पुन्हा एकदा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय.  पनवेलमधल्या कळंबोलीतल्या सुधागड कॉलेजमध्ये ऑफलाईन प्रवेशाच्या प्रकरणातून पुष्पा सूर्यवंशी आत्महत्या केली. 


या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. त्यापार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं.  ऑफलाईन प्रवेशाला अजिबात परवानगी नसल्याचं सांगत याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकही घेणार असल्याचंही तावडेंनी म्हटलंय. 


दरम्यान पनवेलच्या सुधागड एज्युकेशन सोसायटी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिलीय.