अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चौलमधील महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीशी भरवर्गात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणा-या शिक्षकाविरूदध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल पाटील असं या शिक्षकाचे नाव असून तो फरार आहे. तो शेतकरी कामगार पक्षाचा पुढारी असून अलिबाग तालुका पंचायत समितीचा माजी उपसभापती आणि विद्यमान सदस्य आहे. 


ही पिडीत विद्यार्थीनी परीक्षेचा पेपर लिहीत असताना शिक्षक अनिल पाटीलनं तिच्या बाकाजवळ जावून तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पिडीत विद्यार्थीनीनं दुस-या शिक्षकाकडे तक्रार केली तेव्हा त्याला तेथून बदलण्यात आलं. 


हा प्रकार मुलीनं आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांसोबत पोलिसांत गुन्हा दाखल केला. शिक्षकाकडून झालेल्या या कृत्याबद्दल परीसरात संताप व्यक्त होतोय.