ठाणे : ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. ठाणे-कासारवडवली मेट्रोचे भूमिपूजनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मोदींच्या शेजारी उद्धव यांना बसवण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.


गेल्या 7 वर्षांपासून शिवसेनेने या मेट्रोसाठी पाठपुरावा केल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. मेट्रोचे श्रेय भाजपला मिळू नये यासाठी शिवसेनेची ही केविलवाणी धडपड आहे का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.