नाशिक : गोदावरी नदीच्या पाण्यानं अत्युच्च पातळी गाठली आहे. शहरातला गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेलाय. तसंच अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यामुळं पुलांवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी नाशिकरांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरामुळं नाशिक जि्ल्ह्यात चार जणांचा बळी गेलाय. शहरातील रामवाडी पूल, रामसेतू पूलयासह गोदावरीवरील काही छोटे मोठे पुल वाहातुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सर्व महापालिका शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळच असलेल्या भांडी बाजारात पाणी शिरलंय. इथली सराफा दुकानं रिकामी करायला सुरुवात झालीय. गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. 


नाशिक जिह्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिव्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होतेय. धरणक्षेत्राबरोबरचा नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होतेय. त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.  पहाटेपासून गंगापूर धरणातून १२५५५ क्युसेक पाणी गोदावरीत सोडण्यात आलंय. तर दारणा धऱणातून २१ हजार क्युसेक पाणी दारणा नदीत सोडण्यात आलंय. जिल्ह्यातील अनेक छोट्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परिसारातील मंदिर पाण्याखाली जाण्यास सुरुवात आली. दिंड़ोरी रोड परिसारात पावसाचे पाणी घरांमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे.