पुणे : पुणेकरांसाठी एक गुड न्यूज... पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५५० नवीन बसेसची भर पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमपी ही पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. मात्र, शहरात गेली अनेकवर्ष पुरेशा प्रमाणावर बसेस उपलब्ध नाहीत. बस खरेदीची केवळ आश्वासनं आणि घोषणाच होत आल्यात. या पार्शवभूमीवर ताफ्यातील बसेसची संख्या वाढवण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. 


पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार महापालिकेच्या मालकीच्या ५००, भाडे तत्वावरील ५०० तसेच एस टी महामंडळामार्फत ५५० एसी बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. 


त्याची निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत या बसेस रस्त्यावर धावायला सुरवात होईल.