मुंबई : महाराष्ट्र सरकार स्वत:चं कापसाचं बीटी वाण तयार करणार आहे. त्यामुळे शेतक-यांना स्वस्तात कापसाचं बीटी वाण उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षापासून म्हणजे 2018 पासून हे वाण बाजारात येणार असून 350 रूपये किलोने हे वाण मिळणार आहे. त्यामुळं शेतक-यांना फार मोठा दिवासा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बाजारात मॉन्सेटो या कंपनीचं कापसाचं बीटी वाण आहे. 2 हजार साली ही कंपनी बाजारात आली. मात्र या कंनीची मुदत संपली आहे. 2006 पर्यंत हे बियाणे चांगले होते. मात्र त्यानंतर या बीटी बियाणाचा दर्जा घसरू लागला. कापसावर कीड पडायला लागली, म्हणून फवारणी करण्याची गरज भासू लागली. शेतक-यांचा उत्पादन खर्चही वाढला. म्हणून राज्य सरकारनं आता स्वत:च कापसाचं बीटी वाण तयार करण्याचा निर्णय घेतलाय.