कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारने कोल्हापुरातल्या सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनय पवार हा सातारा जिल्ह्यातल्या उंब्रजचा आहे. तो सनातनचा साधकही आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार आहे. दरम्यान वीरेंद्र तावडेच्या पोलीस कोठडीत 16 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 


सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित आणि फरार विनय बाबूराव पवार याने कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात टेहळणीचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.


पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला गुरुवारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणीस्तर न्यायाधीश यू. बी. काळपागर यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत १६ सप्टेंबरपर्यंत वाढविली. 


दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तावडेवर सीबीआयने बुधवारी पुणे येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.