कोल्हापूर : गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी वीरेंद्र तावडे याच्या  विरूध्दचा खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तावडे यांच्यावर  दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. गोविंदराव पानसरे यांच्यावर 438 पाणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आज कोल्हापूर कोर्टात तावडेला हजर करण्यात येणार होते. पण येरवडा जेलनं पुण्यात केस असल्याने तावडेला कोल्हापुरात आणणं शक्य नसल्याचं कोर्टाला सांगितल्यामुळं कोर्टानं व्हिडीओ कॉन्फरन्सीगव्दारे सुनावणी घेतली.


यावेळी कोर्टाने आरोपपत्र दाखल झाल्यानं हा खटला आता जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्याचं कोर्टाने तावडेला सांगितले. त्याचबरोबर या संदर्भात येत्या 22 डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचंही सांगितले.