नातवाची हत्या करून आजोबांनी इमारतीवरून स्वत:ला झोकून दिलं
पुण्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस येतंय. शनिवारी एका आजोबांनीच आपल्या नातवाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केलीय.
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस येतंय. शनिवारी एका आजोबांनीच आपल्या नातवाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केलीय.
पुण्यातल्या कोंढवातल्या जैन सोसायटीमध्ये सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडलीय. त्यामुळे, या परिसरात एकच खळबळ उडालीय.
सुधीर दगडूमल शहा या व्यक्तीनं पहिल्यांदा आपल्या १० वर्षांचा नातू जिनय शहा याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही इमारतीवरून खाली झोकून दिलं. पण, त्यांनी हे कृत्य का केलं? यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे, याची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.