मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला मिळाला बाबा गुरूवानंद स्वामींचा प्रसाद
राज्यात एकीक़डं बुवाबाजी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना पुण्यात अशाच एका बाबाच्या हातचलाखीचा प्रसाद मिळाल्याचा अनुभव एका कार्यक्रमात आला.
पुणे : राज्यात एकीक़डं बुवाबाजी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना पुण्यात अशाच एका बाबाच्या हातचलाखीचा प्रसाद मिळाल्याचा अनुभव एका कार्यक्रमात आला.
सूर्यदत्त पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आचार्य गुरूवानंद स्वामी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित भक्तगणांकडून बाबाजी की जय हो चे नारे दिले गेले. पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलेल्या सर्वच गौरवमूर्ती त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. या सर्वांनाच बाबाजींनी आशीर्वाद दिले.
आशीर्वाद देताना त्यांनी काहींना हवेतून माळा काढून दिल्या. तर काहींना मणी आणि खडे दिले. यावेळी उपस्थितांनी अमृता फडणवीस यांना भजन गाण्याचा आग्रह केला. भजन गायल्यानंतर परत जाताना अमृता फडणवीस यांनाही बाबांनी हवेतून माळ काढून आशीर्वाद दिले. त्यामुळं खूष झालेल्या उपस्थितांनी पुन्हा बाबाजींचा जय हो केला.