मुंबई: माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवाण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिगच्या आरोपावरून भुजबळ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण छगन भुजबळ यांच्या अटकेमागे एका हवाला ऑपरेटरची जबानी कारणीभूत ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भुजबळांच्या अकाऊंटंटनं आपल्याला कोट्यवधींची रक्कम दिली ती आपण कोलकत्यामधल्या बनावट कंपन्यांना पुरवली, असं त्यानं सांगितलं, त्यामुळे भुजबळ अडचणीत आले, अशी माहिती ईडीमधल्या सुत्रांनी दिली आहे.