पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला आणि बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या. एकीकडे या रांगा लागत असताना पिंपरी चिंचवडमधला एक अवलिया मात्र नोटा जमा करतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवड मधल्या शैलेंद्र पांड्ये यांनी हा संग्रह केला आहे.  १९७७ सालापासून त्यांना नोटांचा, तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद लागला. 


तेव्हा पासून त्यांचा हा छंद अव्याहत पणे सुरु आहे. पांडेय यांनी देश-विदेशातील नोटा, नाणी, पोस्ट तिकीट आणि पुरातन काळातील मुद्रांकाचा आगळावेगळा संग्रह केलाय. विविध गव्हर्नरच्या काळात छापण्यात आलेल्या असंख्य प्रकारच्या नोटा आपल्या संग्रहात गोळा केल्या आहेत. 


एक रुपयापासून ते दोन हजारपर्यंतच्या नोटांचा यात समावेश आहे. सध्या चलनातून पाचशे आणि एक हजाराची नोट बंद करण्यात आली असली, तरीही या अवलियाने मात्र अशा प्रकारच्या विविध नोटा संग्रही ठेवल्या आहेत. 


ब्रिटिश गव्हर्नर, मोगल साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी असताना वापरले जाणारे अनेक मुद्रांक ही पांडये यांच्या संग्रहाची उंची वाढवत आहे. एकूणच काय एकीकडे नोटा बदलीसाठी रांगाच रांगा असताना पांडये यांच्या या आगळ्या वेगळ्या छंदाची चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे!