सोलापूर : गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात निवडणुक उमेदवार असलेले मकरंद अनासपुरे निवडणुक अर्ज भरताना एक-दोन रुपयांचे चिल्लर भरताना दाखवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी त्याचप्रमाणे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या विश्वनाथ व्हनकुरे यांनी आपली अनामत रक्कम म्हणून चक्क एक, दोन आणि पाच रुपयांची चिल्लर जमा करून अर्ज भरला. 


केवल राजकारणात एक स्टंट करायचा म्हणून निवडणूक कार्यालयातील कर्मचा-यांचा वेळ घेतला. त्यांनी दिलेल्या अडीच हजारांच्या चिल्लरमुळे मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.