पुणे : आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतक-यांच्या समस्यांवर लघूपट बनवण्याचं धाडस पिंपरी चिंचवडच्या मंदार शिंदेनं दाखवलं. मंदारच्या या लघुपटाला थेट दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडच्या गेवराईमधून थेट पुण्याच्या प्रसिद्ध आय टी कंपनीतील नोकरी हा खरं तर कुणालाही हवाहवासा प्रवास.. मनोज शिंदेचाही असाच स्वप्नवत प्रवास..पत्नी मुलगा असा परिवार आणि गलेलठ्ठ पगार. पण मनोजने अचानक नोकरी सोडली आणि सरळ दुष्काळी भाग गाठला. 


लहानपणापासून दुष्काळ पाहिल्याने त्याचं मन अस्वस्थ होत  होतं. त्यातच शेतकऱ्याच्या आत्महत्या त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या.  शेतकऱ्यांसाठी काही तरी करायचं या विचारतच त्याने बॅलेट ऑफ ड्रॉट ही शॉर्ट फिल्म बनवली. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरातील स्त्रियांची काय मानसिक अवस्था असते ते त्याने यात दाखवले आहे..!  


मनोजच्या बॅलेट ऑफ ड्रॉटला दादा साहेब फाळके चित्रपट महोत्सव 2017 मध्ये स्पेशल मेंशन पुरस्कार ही प्राप्त झालाय आणि त्याला इतर ही अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवात त्याची निवड झालीय...!


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणारे अनेक आहेत पण थेट त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याचे सादरीकरण करत त्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या मनोज सारख्या तरुणांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.