परभणी : परभणीतील बालक आश्रमात राहणा-या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला बालक आश्रमातून हाकलून देण्याची घटना ताजी असतांनाच परभणीच्या सोनपेठ तालुक्यातही शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनीच घरी तक्रार केल्यामुळं पालकांनी पुढाकार घेऊन हा प्रकार उघडीस आणलाय. मुख्याध्यापक बालाजी मुंडेच्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर त्यांन आत्महत्येची धमकी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. 


मात्र गावक-यांनी त्याच्या धमक्यांना भीक न घालता सोनपेठ पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. 


राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुली शिकल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असतांना अश्या किळसावाण्या प्रकारामुळच मुलींचा शिक्षणातला टक्का घसरू लागला आहे. त्यामुळे या शिक्षकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करू लागली आहेत..