शिर्डी : या वर्षीचा कडक उन्हाळा सर्वांनाच नको नकोसा झालाय. यात देव दर्शनासाठी आलेले भाविकही कसे सुटतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांनाही मंदिर परिसराता जाताना पादत्राणे बाहेर काढून जावे लागतात. त्यामुळे भाविकांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळण्यासाठी साई संस्थानने विशेष प्रयत्न केलेत. 


साईमंदिर परिसरात पांढ-या कापडाचा मंडप उभारण्यात आलाय. तसेच फरशीवर पांढ-या रंगाचे पट्टे मारण्यात आलेत. ठिकठिकाणी पाणी पुरवठ्याचीही व्यवस्था करण्यात आलीय. दर्शन रांगेत पंख्यांबरोबर कुलरची संख्या वाढविण्यात आलीय.