बीड : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अनेक ग्रामीण भागातील नदीनाल्यांच्या पाण्यात वाढ होतेय. शहरातल्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलंय. अनेक गावातील तलाव फुटून पाणी गावात शिरलंय. पुराच्या पाण्यात जनावरंसुद्धा वाहून गेलीत. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसलाय. बिंदुसरा नदीला पूर आल्याने आंबेडकर चौक, मोमीमपुरा, भालदार पुरा, बाबा चौक,मोंढा, बालाजी मंदिर या भागात तसंच नदीकाठच्या घरात पाणी शिरलंय.


जुन्या बीड मधील लोक घरात अडकल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाटोदा तालुक्यात शंभर मिमीहून अधिक पावसाची नोंद झालीय. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 119.17 टक्के पावसाची नोंद झाली आहे.