नाशिक : नाशिक जिल्ह्याला वादळी वा-यासह पावसानं झोडपून काढलं. संध्याकाळी बरसलेल्या या जोरदार पावसाचा फटका नाशिककरांना बसला. यामध्ये देवळाली, सटाणा तालुक्यातल्या घरांचं नुकसान झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोधो कोसळणा-या पावसात वीज पडून चार ते पाच जनावरांचा मृत्यू झाला. उकाड्यानं हैराण नाशिककरांना या पावसामुळे गारवा तर मिळाला. त्याचवेळी पावसाच्या जोरदार तडाख्यानं नुकसानीलाही सामोरं जावं लागलं.