गडचिरोली : भामरागडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलच बस्तान बसवलय. संततधार पावसानं पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री पुराचे पाणी वाढल्याने गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. 


काही काळासाठी दळण वळण सुरू झालं मात्र पुन्हा पर्लकोटाच्या पुलावर एक ते दोन फूट उंच पाणी चढल्यानं शेकडो महिला आणि नागरिक ह्यात १५ तास अडकून पडले . 


एकमेकांना पकडून साखळी करत या पुरातून महिलांनी घरची वाट धरली. प्रशासनाकडून मात्र पुरातून प्रवास करू नका असा एका ओळीचा संदेश पाठविण्या व्यतिरिक्त फारशी मदत झाली नाही.