सातारा : सातारा शहरात आज सायंकाळी पाच वाजता मुसळधार पाऊस झाला. सुरूवातीला शहर आणि परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक पावसाच्या हलक्या सरी आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र पाच वाजता मुसळधार सरी आल्या, रविवार असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.


पावसासोबत सोसाट्याचा वाराही वाहत होता. त्यामुळे पोवई नाक्‍यावर काही झाडे उन्मळून पडली. सोसाट्याचा वारा असल्याने काही ठिकाणी झाडं उन्मळली.