पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा-कोर्ट
खारघरमधल्या २९ गावांसह पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
नवी मुंबई : खारघरमधल्या २९ गावांसह पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
पनवेल नगरपरिषदेसह २९ गावांचा समावेश करुन नवी पनवेल महापालिका १ ऑक्टोबरपासून स्थापन करण्याची अधिसूचना, राज्य सरकारनं काढली होती. त्याला खारघर ग्रामपंचायत आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
तर महापालिकेत समाविष्ट होण्याची इच्छा असूनही सरकारनं तसं केलं नसल्याबद्दल, पाली देवद ग्रामपंचायतीसह अन्य काही ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालया याचिका देखील केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला.