राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील पाराही पहिल्यांदा चाळीस अंशाच्यावर स्थिरावला आहे.
नाशिक : मालेगावचं तापमान गेल्या चोवीस तासात ४२.४ अंशावर पोहचलं आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील पाराही पहिल्यांदा चाळीस अंशाच्यावर स्थिरावला आहे.
नेहमीच गारवा अनुभवणारे नाशिकक्करणी आता दुपारी बाहेर न पडणे पसंत केले आहे, मार्चच्या सुरुवातीला काही काळ बारा अंशापर्यंत खाली गेलेले तापमान थेट आग ओकू लागल्याने, नाशिककराना एप्रिल मे चांगलाच तडाखा देणार आहे. दुसरीकडे जळगावमध्ये तापमानाने ४१ डिग्री अंश सेल्सियसचा पारा गाठला आहे.
जळगावसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पारा आज ४० ते ४१ अंशावर पोहचला आहे, अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिकांना दुपारी बाहेर पडणे जिकरीचे झालंय. उन्हाचा फटका बसत असल्याने नागरिकांना बाहेर पडताना पांढरे रुमाल, टोप्यांचा आश्रय घ्यावा लागला.