विदर्भ तापला, पारा वाढता वाढे
दिवसेंदिवस विदर्भातला पारा वाढतानाच दिसतोय. पाऱ्यानं चाळीशी केव्हाच पार केलीय.
अकोला : दिवसेंदिवस विदर्भातला पारा वाढताना दिसतोय. पाऱ्यानं चाळीशी केव्हाच पार केलीय. सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झालीय. विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरीत झालेय. सोमवारी विदर्भात विक्रमी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज ब्रह्मपुरीत तापमान ४७ अंश सेल्सिअस होते.
अकोल्यात ४५ अंश सेल्सियस येवढं तापमान नोंदवलं गेलंय. तर सर्वात कमी तापमान अकोल्याच्या शेजारच्या वाशिम जिल्ह्यात नोंदवलंय. वाशिममध्य़े ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. अकोल्यानंतर वर्ध्यात सर्वात जास्त म्हणजे ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
कामे सकाळीच करण्याच्या प्रयत्न
मागच्या आठवड्यात वर्ध्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. वाढत्या उन्हामुळे नागरिकांची लाही लाही होतेय. आता तर कुलर पण या कडक उन्हापुढे टिकतील का? अशी चिंता नागरिकांमध्ये आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक महत्त्वाची कामं सकाळीच करण्याच्या प्रयत्नात असतात. जर उन्हात घराबाहेर पडावंच लागलं.
तर उन्हापासून बचावासाठी शीतपेयांचा आधार घेतला जातोय. या तापमानात येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
नोंद झालेली गावे
नागपूर- 43.6
अकोला 45
अमरावती 43.4
बुलडाणा 41.7
ब्रम्हपुरी 44.1
चंद्रपुर 43.6
गोंदीया 42.2
वाशइम 41.6
वर्धी 44.9
यवतमाळ 43.5