ठाणे : उन्हाच्या तापलेल्या झळा, पाण्याचे दुर्भिक्ष, रस्ते रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या उकाड्याचा फटका पशु पक्ष्यांनाही बसतो आहे.


तीव्र उन्हाच्या झळांनी अनेक पक्षी, कुत्रे आणि मांजरी यांना त्रास होतं आहे. भोवल येऊन पडण्याचं प्रमाणही या पशु पक्षांमध्ये वाढलं आहे. जखमी अवस्थेत आढळलेल्या पशुपक्षांवर एएसपीसीए या संस्थेत शुश्रुषा केली जाते आहे. सनस्ट्रोकपासून वाचविण्यासाठी येथे खास व्यवस्था करण्यात आलीय. त्यांच्यावर योग्य ती शस्त्रक्रिया करून घोडबंदर रोड आणि मानकोली परिसरातील जंगलात सोडून दिलं जातं.