मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्याच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा सलग तिसरा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचएससी बोर्डाने स्वत: ही माहिती दिली असून परीक्षा सुरु होण्याआधी वॉट्स अपवर प्रश्नपत्रिका व्हायरल होत असल्याची माहितीही समोर येतेय. आठवड्याभरात मराठी, एसपी आणि गणित अशा सलग तीन प्रश्नपत्रिका फुटल्याने बोर्डाच्या कामाकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.


परिणामी, विद्यार्थी आणि पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला असून परीक्षा पुन्हा होणार का? याबाबतही अफवा पसरवल्या जात आहेत. या गोंधळातच विद्यार्थी परीक्षा देत आहेत.


दुसरीकडे, उच्च माध्यमिक महामंडळ मात्र अजूनही पेपर फुटल्याचं मान्य करत नाही. विद्यार्थी परीक्षा केंद्रात असताना पेपर व्हायरल होतोय. त्यामुळे पेपर फुटलेले नाहीत असं बोर्डानं पुण्यात पत्रकार परिषदेत म्हटलंय. 


दरम्यान, या पेपरफुटीचे पडसाद विधीमंडळातही उमटले. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विनोद तावडेंवर टीका केलीय. विनोद तावडेंनी मात्र बोर्डाचीच री ओढत पेपर फुटलेले नसल्याचं म्हटलंय