पुणे : स्वस्त धान्य योजनेतील शेकडो पोती धान्य कच-यात टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औंध परिसरातल्या पाटील पडळ वस्तीमधल्या एका खाणीत हे धान्य टाकून देण्यात आलं. त्यामध्ये सुमारे १०० पोती गहू, तसंच सुमारे ५० पोती तांदूळ आहे. या पोत्यांवर सरकारी योजनेतील धान्य असा शिक्काही आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. 


रविवारी स्थानिकांनी हे धान्य पाहिल्यानंतर, परिसरातले अनेक गोरगरीब हे धान्य घरी घेऊन गेले. तर उर्वरीत धान्यावर डुकरांनी ताव मारला. हे धान्य कोणी आणि का फेकून दिले याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.