पिंपरीत निवडणुकीच्या रिंगणात राजा राणीच्या जोड्या...!
उमेदवारी कोणाला मिळणार हे माहीत नसल्याने अनेक इछुकांनी देव पाण्यात ठेवले असताना पिंपरी चिंचवड ३ पती पत्नींच्या जोडयांना उमेदवारी मिळालीय... पाहुयात झी २४ तास चा स्पेशल रिपोर्ट...!
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : उमेदवारी कोणाला मिळणार हे माहीत नसल्याने अनेक इछुकांनी देव पाण्यात ठेवले असताना पिंपरी चिंचवड ३ पती पत्नींच्या जोडयांना उमेदवारी मिळालीय... पाहुयात झी २४ तास चा स्पेशल रिपोर्ट...!
घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून अनेक पक्षांनी एका घरात एकच तिकीट दिले जाईल असं सर्वच पक्षांनी खर पण अपरिहार्यतेमुळं म्हणा किंवा पर्याय नसल्यामुळं म्हणा पिंपरी चिंचवड मध्ये पती पत्नींना उमेदवारी देण्यात आलीय....राष्ट्रवादीने दोन जोडप्याना उमेदवारी दिलीय...!
पिंपळे सौदागर मधून विठ्ठल उर्फ नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे याना पक्षांनी उमेदवारी दिलीय... एरवी एकत्र संसार करणारी ही जोडी आता एकत्र राजकारण ही करणार आहे...केवळ काम केल्यामुळं तिकीट मिळाल्याचा दावा ते करतायेत...!
काटे दाम्पत्या प्रमाणेच राष्ट्रवादीने कलाटे पती पत्नींना ही उमेदवारी दिलीय...वाकड परिसरात सक्रिय असलेल्या मयूर कलाटे आणि स्वाती कलाटे यांच्या वर ही पक्षाने विश्वास टाकलाय... आता त्यांचा ही दावा तोच आहे केवळ विकासामुळं केलेल्या कामामुळं उमेदवारी मिळाल्याचे ते सांगतात...!
राष्ट्रवादी प्रमाणेच मनसे ने ही सचिन चिखले आणि अश्विनी चिखले पती पत्नीला उमेदवारी दिलीय...आता त्यांच्याकडं उमेदवारांचा वानवा आहे भाग वेगळा, पण तरी हे त्यांचा दावा विकासाचाच आहे!...
आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या राजा राणीनी जनतेसाठी ही काही तरी करावं हीच काय ती अपेक्षा....!