पुणे : मुंबई - पुणे महामार्गामुळे या दोन शहरांमधलं अंतर आणि प्रवासाचा वेळ अत्यंत कमी झाला असला तरी त्यात अजून वाव आहे... लवकरच, हा प्रवास केवळ 11 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो... 'हायपरलूप'च्या साहाय्यानं...


'पीएमआरडीए'चा सकारात्मक प्रतिसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्पेसएक्स' कंपनीचे प्रमुख एलन मुस्क यांनी 2013 मध्ये 'हायपरलूप' या संकल्पनेचं प्रात्यक्षिक आयआयटी टेकफेस्टमध्ये दाखवलं होतं. त्यानंतर ही संकल्पना पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) उचलून धरलीय. नुकतीच, प्रसिद्ध 'हायपर लूप ट्रान्स्पोर्टेशन्स टेक्‍नॉलॉजी' या कंपनीच्या तंत्रज्ञ पथकानं पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात भेट देऊन यासंदर्भात पाहणीही केलीय. 


मेट्रो प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाच्या निम्म्या खर्चात आणि कमी वेळेत ही यंत्रणा उभे राहू शकते; तसेच तिकीट दरही सर्वसामान्य नागरिकांना परवडतील, असं मत पीएमआरडीएनं व्यक्त केलंय. परंतु, या संदर्भात अंतिम निर्णय राज्यसरकार घेणार आहे.


प्रयोग आणि चाचण्या...


या तंज्ञानाचा यशस्वी प्रयोग मे 2016 मध्ये अमेरिकेच्या नॉर्थ लास वेगासमध्ये करण्यात आला. जवळपास  300 मैल ताशी वेगाने ही ट्रेन धावली. या प्रयोगाची चाचणी लॉस वेगासच्या नेवाडामध्ये घेण्यात आली. दुबईमधील अबूधाबी, रशियातील मॉस्को आणि चीन या तीन देशांत सध्या प्रायोगिक तत्त्वावर 'हायपर लूप ट्रान्स्पोर्टेशन्स टेक्‍नॉलॉजी' या कंपनीकडून ही वाहतूक व्यवस्था उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात हे तंत्रज्ञान भारतात आल्यास, मुंबई-पुणे हा प्रवास आता 11 मिनिटांत करणे शक्य होणार आहे.


हायपरलूप म्हणजे काय?


एलिव्हेटेड रेल्वेप्रमाणेच उंचावरून तयार केलेल्या मार्गावरून एका पोकळीतून बर्फावर स्किंग केल्याप्रमाणे वेगाने प्रवास करण्याची ही संकल्पना आहे. या प्रवासात उंचावरील नळ्यांच्या पोकळ्यातून केवळ हवेच्या गादीवरून सुमारे 800 मैल प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे.