इगतपुरीत काही IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा `नंगानाच`
इगतपुरीतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिवारातील मुलांनी धिंगाणा घातला आहे. अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : इगतपुरीतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिवारातील मुलांनी धिंगाणा घातला आहे. अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यात काही बारगर्ल्सचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. यात बहुतेक आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
इगतपुरीतल्या एका रिसॉर्टवर हा धिंगाणा सुरू होता. १३ तरुण-तरुणींवर ड्रग्स, अल्कोहोलचं सेवन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी मध्यरात्रीची ही घटना घडली असली तरी, त्यांना तातडीने जामीनही देण्यात आला, यामुळे ही बाब उशीरासमोर आल्याचं सांगण्यात येत आहे.
शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील काही आयएएस, आयपीएस आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुलांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.