अवैध गर्भपात : वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
गेल्या अनेक दिवसापासून फरार असणार्या वर्षा लहाडेचे बचावाचे सर्व मार्ग बंद झाल्यानतर पोलिसांना शरण आल्या. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या गेल्या १५ - २० दिवसापासून फरार होत्या.
जिल्हा रुग्णालयात सेवा बजावताना अवैध पद्धतीने गर्भपात केल्या प्रकरणी लहाडेवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सरकारी सेवेत असताना देखील स्वताचे खाजगी रुग्णालय चालविणे मुदत संपलेल्या औषधांचा रुग्णांना पुरवठा करणे अशा विविध कलमे दाखल करण्यात आली होती.
मात्र आपली अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिन अर्जाची ढाल लहाडे ने घेतली होती. मात्र गंभीर गुन्ह्यात अडकल्याने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळण्याची शक्यता वाढल्याने लहाडेने अटकपूर्व जमीन अर्ज मागे घेऊन पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास लहाडे सरकारवाड पोलिसात दाखल झाल्या.
पोलिसांना शरण आलेल्या लहाडेला जिल्हा न्यायालयात दाखल केले असता न्यायायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात अवैध रित्या गर्भपात करणारे रँकेट कार्यरत असल्याचा संशय सरकरी पक्षाने व्यक्त केला असून या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे, वर्षा लहाडेने आजवरच्या सेवेत किती गर्भपात केलेत अशा सर्वच प्रश्नाची उत्तर येणं गरजेच असल्याचे सरकरी पक्षाने न्यायलयात निवेदन केले.
सरकरी रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आल्याने त्यातील सर्वात महत्वाची घटना आज घडलीय. आजवर फरार असणर्या वर्षा लहाडेच्या विरोधात लूकआउट नोटीस बजावून तिचे देशाबाहेर बाहेर जाण्याचे मार्गही बंद करण्याची तयारी सुरु झाली होती. शरण त्यामुळे शरण येण्याशिवा पर्याय नसलेल्या लहाडे कडून पोलीस कोठडीत काय माहिती हाती लागते याकडे लक्ष लागलाय.