गणेश नाईक यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांची याचिका फेटाळली.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांची याचिका फेटाळली.
नवी मुंबईत सिडको आणि एम आय डी सी यांच्या जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करू नये यासाठी गणेश नाईक सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.
सिडकोच्या बेलापूर येथील जागेत गणेश नाईक यांनी ग्लास हाऊस बांधले होते. आता या जागेवर सिडको मरीन सेंटर बांधणार आहे. तसंच पाव्हणे औद्योगिक वसाहतीतील बावखलेश्वर देवस्थान येथील कार्यालय देखील उद्योगिक वसाहतीच्या मालकीचे होणार आहे.