अनैतिक संबंधात अडसर झाल्याने डॉक्टरने केली पत्नीची हत्या
शहरात एक धक्कादायक बाब उघड झालेय. डॉक्टरने अनैतिक संबंधात अडसर झाल्याने मैत्रणिच्या मदतीने पत्नीची हत्या केली.
सोलापूर : शहरात एक धक्कादायक बाब उघड झालेय. डॉक्टरने अनैतिक संबंधात अडसर झाल्याने मैत्रणिच्या मदतीने पत्नीची हत्या केली.
खून प्रकरणाचा अखेर उलगडा
सोलापूरातील बहुचर्चीत रश्मी अग्रहार खून प्रकरणाची अखेर उलगडा झालाय. पती डॉ प्रसन्न अग्रहार यांनंच रश्मी अग्रहारचा खून केलाय. अनैतीक संबंधाच्या आड येत असल्यानं प्रसन्न अग्रहारनं आपली मैत्रीण मेघा रॉय चौधरी हिच्या मदतीनं रश्मीची हत्या केली.
खूनाचे पुरावे नष्ट
९ जुलै २०१५ रोजी ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी डॉ प्रसन्न तसंच मेघा चौधरीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या दोघांसह गंगामैय्या हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एस. प्रभाकर, डॉ. भाऊसाहेब गायकवाड, डॉ अमित कुलकर्णी या अन्य तीन डॉक्टरांवरही खुनाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.