औरंगाबाद : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्याती तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस पर्यंत कायम आहे. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्याती ४३. ६ तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. 


या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चालले आहे. शेतकऱ्यांना शेतात काम करणे मुश्कील झाले असून , शहरीभागात अनेक रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे. रस्त्यावर उन्हाची तीव्रता सहज अनुभवता येत असून जीवाची लाही लाही करणाऱ्या या उन्हामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत.



घामाच्या धारा , बंद वारा आणि उन्हाचे भाजून काढणारे चटके अशी स्थिती धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक पदोपदी अनुभवताय. यावर्षी सतत ४३ अंश सेल्सियस तापमान अनेक दिवस कायम राहण्याचा विक्रमच स्थापिक झाला आहे.