`अॅट्रॉसिटी कायदा ब्राह्मण समाजालाही लागू करा`
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं शहरात मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात ब्राह्मण समाजाने ही काही मागण्या केल्यात.
पिंपरी चिंचवड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं शहरात मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात ब्राह्मण समाजाने ही काही मागण्या केल्यात.
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याऐवजी ब्राह्मण समाजाचाही त्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी महासंघाचे प्रवक्ते रवीकिरण साने यांनी केली. या मेळाव्याला ब्राह्मण चळवळीचे प्रणेते ह. मो. मराठे उपस्थित होते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा समाजाकडून आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि कोपर्डी प्रकरणी फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मोठे मोर्चे निघत आहेत.
तर दुसरीकडे काही ठिकाणी दलित संघटनांनी एकत्र येऊन अॅट्रॉसिटी कायद्यात बदल न करण्याची मागणी केली आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिला आहे, तर कोपर्डी प्रकरणात जास्तच जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध दलित संघटनांनी केली आहे.