पुणे  : बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत आयकर विभागाने छापा मारला. हा छापा पर्वती शाखेत पंधरा लॉकर असल्याच्या पार्श्वभूमीवर मारण्यात आला आहे. या लोकरमध्ये जवळपास १० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कंपनीचे हे लॉकर आहेत. या लॉकर विषयी माहिती आयकर विभागाला मिळाली होती. या पंधरा लॉकरमध्ये दोन हजार आणि शंभर रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत.


 हे लॉकर खोलून नोटा मोजण्याचे काम सुरू आहे. दोन हजार आणि शंभर रुपयांच्या दहा कोटींच्या नोटा असल्याची माहिती संबधीत कंपनीच्यावतीने आयकर विभागाला देण्यात आली आहे.


बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमध्ये दडवलेली एका बहुराष्ट्रीय कंपनीची कोट्यवधींची रक्कम प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. वैध चलनातील रक्कम 10 कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही रक्कम अधिक असल्याची शक्यता आहे. कारण कंपनीचे सर्व लॉकर तपासण्यासाठी आणखी एक दिवस लागू शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.