जानकरांना अजित पवारांचा सल्ला .....
दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुकून प्यावे लागते..अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतलाय.. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आलेल्या पवारांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिलाय..
इंदापूर : दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुकून प्यावे लागते..अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतलाय.. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आलेल्या पवारांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिलाय..
मंत्रीपदावर असताना जानकर यांनी अनेक बेताल वक्तव्य करुन आपल्यासमोर अडचणी वाढविल्या आहेत..त्याचा धागा पकडत अजित पवारांनी जानकर यांच्यावर टीका केली.
मंत्रीपदावर असल्यावर जनतेची काम करा, समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करा..महत्वाच्या पदावर बसल्यावर जपून बोलावच लागत..एकदा मी अनुभव घेतलाय.. त्यासाठी मी चव्हाण साहेबांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश केलाय..
त्यामुळे जरा जपूनच वागा असा सल्ला पवार यांनी जानकरांना दिला. इंदापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ अजित पवार आले होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
व्हिडिओ पाहा....