भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!
नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.
नाशिक : नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.
शहरात मशिदीमधून दहशतवादाविरोधात पत्रांचं वाचन करून तरूणांचं प्रबोधन केलं जातंय. दहशतवादाशी लढा देण्याचं तसंच कोणत्याही आमीषाला बळी न पडण्याचं आवाहन केलं जातंय.
मुस्लिमबहूल परिसरात दहशतवादाविरोधात होर्डींग्ज झळकावले जात आहेत. मशिदीबाहेर रस्त्यावरही दहशतवादाविरोधात प्रचार सुरू आहे.
लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, आयसीस अशा संघटनांचा निषेध केला जातोय. दहशतवादाला इस्लाममध्ये थारा नाही हे कसोशीने सांगितलं जातंय.