पुणे : तिकिट न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची सर्वच पक्षांमध्ये मोठी संख्या आहे. भाजपही यापासून मागे कसं राहिल. मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असतानाही पुणे भाजपमधील नाराजी नाट्य सुरुच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इच्छुक उमेदवारांकडून पक्षनिधी म्हणून घेतलेले पैसे परत मिळावेत यासाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भाजप कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. उमेदवारी न मिळालेले दोन इच्छुक उमेदवार पैसे परत मागण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री गिरिश बापट यांच्यासोबत हुज्जत घातली. तसंच पोस्टरबाजीही करण्यात आली. उमेदवारीसाठी दिलेली रक्कम परत मिळावी गाजर नको, असे पोस्टर भिंतींवर लावण्यात आले होते.


नाराजांची पोस्टरबाजी