औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बर्ड फेस्टच्या निमित्तानं जायकवाडीकाठी पक्षी प्रेमींचा मेळा भरला आहे. सकाळच्या गुलाबी थंडीत परदेशी पक्ष्यांचे थवे आणि अथांग पाण्यात मुक्त विहार करणारे पक्षी तुमची सकाळ आनंदी करुन जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो मैल प्रवास करुन नाथसागरात स्थिरावणा-या या परदेशी पाहुण्यांनी पक्षीप्रेमींचं मन जिंकलंय. यातले काही पाहुणे रशियातून आलेत तर काही थेट सायेबरियातून तर काही पक्ष्यांनी थेट युरोपातून उड्डाण भरलंय. बलुचिस्तान सारख्या देशातून आलेल्या पाहुण्यांचाही यात समावेश आहे. 


हे सगळे पक्षी थंडी आहे तो पर्यंत नाथसागरात विसावतात आणि उन्हाचा कडाका वाढला की सुरु होतो त्यांचा परतीचा प्रवास.


नाथसागराच्या किनाऱ्यावर सगळ्यात जास्त आकर्षण आहे ते फ्लेमिंगोंचं. तसा या पक्ष्यांचा मुक्काम जवळपास तीन दिवस असतो. याठिकाणी सध्या खास आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव भरवण्यात आलाय. या महोत्सवासाठी पक्षीप्रेमींसह पर्यटकही मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत.