नवी मुंबई : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग लावणा-या चार सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही टोळी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईज हैदराबाद या दोन संघाच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावत होते. त्यांच्याकडून 18 मोबाईल फोन, 1 टिव्ही, 1 लॅपटॉप, असा सुमारे एक लाख 15 हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला गेला. 


नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नवीन पनवेल सेक्टर 2 मधल्या एका फ्लॅटवर छापा मारुन ही कारवाई केली.