नवी मुंबई : रेल्वे गाडीच्या वेळापत्रकाची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने आयआरसीटीला रेल्वेचे तिकिट आणि ७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईचे रहिवासी गोपाळ बजाज यांनी दाखल याबाबत तक्रार केली होती. मे २०१३ मध्ये गोपाळ यांनी नागपूर मुंबई एक्सप्रेसचे ऑनलाईन तिकिट काढले होते. त्यानंतर  त्यांना आयआरसीटीसीकडून त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पीएनआर नंबर मिळाला. ट्रेनच्या वेळप्रमाणे ते अमरावती स्टेशनवर पोहचले तेव्हा त्यांना ट्रेन ही नियोजीत वेळेपेक्षा साडेचार तास उशिराने धावत असल्याचे सांगण्यात आले. 


दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी  जनरलचे तिकिट काढले आणि अमरावती ते मुंबई असा प्रवास केला, पण त्या दिवशी ट्रेनही आपल्या नियोजित वेळेतच धावत होती, ही बाबत  माहितीच्या अधिकारात त्यांना मिळाली. त्यामुळे आयआरसीटीसीकडून चुकीची माहिती पुरवल्याबद्दल त्यांनी ग्राहक मंचात तक्रार केली. 


आयआरसीटीकडून त्यांना चुकीची माहिती पुरवल्याचे समोर आले, त्यामुळे ग्राहक मंचाने आयआरसीटीला त्यांचा दोन तिकिटींचा खर्च,  इतर कायदेशीर बाबी आणि मनस्तापाबद्दल सात हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.