औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज प्रचंड गोंधळ झाला. आज खड्ड्यांच्या प्रश्नावरून सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. यात नगरसेवक अधिका-यांविरोधात आक्रमक झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकारी गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवकांचं हे रुप पाहून पालिका आयुक्त सभागृहाबाहेर पडले आणि इतर अधिका-यांनादेखील बाहेर यायला सांगितलं. आयुक्तांसह अधिका-यांनीही सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातल्यामुळं खड्ड्यांचा प्रश्न बाजूलाच राहिला आणि पालिकेत मानापमान नाट्य रंगताना दिसलं.