हा माझा कमबॅक नाही, मी आहे तिथेच - नारायण राणे
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेना-भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे, असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, नोटबंदी, वाढती महागाई, अशा अनेक विषयांवर लोकांमध्ये रोष असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेना-भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे, असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, नोटबंदी, वाढती महागाई, अशा अनेक विषयांवर लोकांमध्ये रोष असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय.
माझा हा कमबॅक नाही, मी जिथे आहे तिथेच आहे. माझी स्थिती मी कधी खालवायला देत नाही. माझी निष्ठा पक्षासाठी आणि जनतेसाठी असल्याचंही यावेळी राणेंनी सांगितलं.
मालवणमध्ये मतदारांनी बदल केला, आमची सत्ता आली नाही, माझ्या त्यांना शुभेच्छा, विकास कामे पुढेही सुरु राहावीत असं नारायण राणे यांनी म्हटलंय.
सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवणे ही काळाची गरज असल्याचंही यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.
काँग्रेस जनतेच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरताना दिसतं नाही. घरात बसून निवडणुका लढवल्या जात नाहीत. कार्यकर्ते तयार आहेत, पण नेते त्यांच्या पाठीशी नाहीत. त्यामुळे कांग्रेस उभारी घेण्याऐवजी पार पिछाडीला जात असल्याचे चित्र आहे.